Monday, 7 April 2025

                   प्रसारमाध्यमे आणि इतिहास

प्रसारमाध्यमांची ओळख : प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार चा अर्थ दूरवर पोहोचवणे. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. पूर्वी गावोगावी दवंडी पिटवत असे. एकाकडून दुसऱ्या बाजूला दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रवास व्हायचा.

 प्रसारमाध्यमांचा इतिहास: आता इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रण कला, वर्तमानपत्रे सुरू झाले. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले. 

वर्तमानपत्रे: मुख्यत: बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाचे विविध बातम्या पूर्वीचे काम करतात. चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्र म्हणजे एक ऐतिहासिक दस्ताऐवज होय. 

वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी:  इजिप्त मध्ये इसवीसन पूर्वकाळात सरकारी अधिवेशन कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढाच व ते कागद प्रांत क्रांती वाटले जात. यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असेल. ज्युनियस सीजरच्या अधिपत्याखाली ॲकटा डायना (डेली ॲक्ट -रोजच्या घटना) नावाची वृत्तपत्रे, रोम मध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच घटनांची पत्रके अधून मधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये  उतरणारे प्रवासी, तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असेल. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असेल. ते ताज्या बातम्या राजदरबार पाठवत.

Tuesday, 4 February 2025

                 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग                         अनेकदा आर्थिक महत्वाकडे करतो परंतु व्यावसायिक कारमधील हा महत्वाचा बैलू आहे. आजच्या लेखात नव्या युगाच्या कौशल्यांवर बोलूयात जगात स्थिर असलेली एकमेव गोष्ट म्हणजे बदत बदल करू शकत नाही किंवा स्वीकारत नाही तो यशस्वी होणार नाही. जग झपाट्याने बदलत आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग या दोन तंत्रांमुळे आपल्या जीवनात आणि सर्व व्यवसायांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. भविष्यात तुमच्या करिअरच्या यशामध्ये ते महत्त्वपूर्ण आणि आवश्यक काय करू शकतो? प्रत्येकाला माझा सल्ला आहे की, नवीन तंत्रे आत्मसात करा आणि शिकून घ्या. शिकणे हीआयष्यभराची क्रिया आहे. जो शिकणे थांबवतो तो अयशस्वी होतो. अगदी सचिन तेंडुलकरही प्रत्यक्ष सामना सुरू होईपर्यंत

  सराव करत असे. सर्व व्यवसायांमध्ये, हे नवीन तंत्रज्ञान, तुम्हाला आवड किंवा न आवडो सर्व कामाचा ताबा घेत आहे. त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार केल्यास, ते तुमचा वेळ, काम आणि अनावश्यक ताण कमी करण्यास मदत करतील.गुजरातमधील दीनदयाल विद्यापीठामध्ये मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणात सांगितले, 'एआय'सारख्या चॅटजीपीटीचा वापर करावा परंतु त्याचा अतिवापर करू नये कारण 'क्रिटिकलचिंकिंग'ची जागा कोणीही घेऊ शकत नाही. असा विचार फक्त मानव करू शकतो."

  नवीन युगातील तंत्रज्ञान, वेळ आणि कामाची बचत करण्याव्यतिरिक्त अनेक फायदे आहेत, ते वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, डॉक्टरांना रुग्णांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांची सेवा मर्यादित भौगोलिक प्रदेशांपुरती ठेवण्याची गरज नाही, परंतु आता ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यांमध्ये रुग्णाला ऑनलाइन सल्ला घेऊ शकतात. हे मदत करत आहे. कर्करोग, संधिवात, मधुमेह इत्यादींसारख्या दीर्घकालीन आजारांच्या रुणांसाठी वरदान आहे. आता औषधाच्या ज्ञानाची जोड देत आहे. सर्व डॉक्टा त्यांच्या अभ्यासक्रमादरम्यान शिकतात, अतिरिक्त कौशल्ये विकसित करतात इंटरनेट, ईपीआर, पेशंट केअर सॉफ्टवेअर वापरणे, नवीन डॉक्टर्स दुर्गम रुग्णांपर्यंत सहज पोहोच् शकतात, आता कल्पना करा, तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत कौशल्ये आणखी विकसित केल्यास तुम्ही वैद्यकीय बंधुत्वातील तुमच्या समवयस्कांपेक्षा वेगळे व्हाल.

 हे इतर क्षेत्रांमध्ये हे लागू होते. तुम्ही वकील असाल तर तुम्हाला यापुढे संविधानातील प्रत्येक कलम लक्षात ठेवण्याची गरज नाही तर या विशिष्ट कलमांचा वापर कसा आणि कुठे करायचा हे जाणून घेण्याची आणि विचार करण्याची गरज आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर या कौशल्यांचा वापर करून तुमच्या कल्पनांना नावीन्यपूर्ण उपाय तयार करण्यात मदत होते. सध्या अनेक ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्म हे अभ्यासक्रम देतात आणि माफक शुल्कात उपलब्ध आहेत. दुसरे म्हणजे ते तुम्हाला शिस्तीत ठेवतात आणि तुम्ही काम करत असाल तर तुम्ही ऑनलाइन फिजिकल कोर्स शिकण्याचा तुमचा वेग ठरवू शकता.

बँककेविना आर्थिक व्यवहार शक्य आहेत? मध्यस्थांशिवाय पुरवठा साखळीची माहिती तपशीलवार मिळवता येणार? अनोळखी लोकांमध्येही विश्वासार्हता टिकणार? हे प्रश्न ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतात. परंतु ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सर्व शक्य करून दाखवते. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात ब्लॉकचेनने नवा बदल घडवला असल्याने व्यवहार सुरक्षित, पारदर्शक आणि विकेंद्रित मागनि करता येतात.



Sunday, 26 January 2025

                          खेळ आणि इतिहास 

मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ.

खेळाचा इतिहास हा माणसाएवढाच जुना आहे कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार हा जसा उदरनिर्वाहचा मार्ग होता तसाच तो खेळ व मनोरंजनाचा एक भाग होता. भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यातून दूत, कुस्ती,रथ, आणि घोड्यांच्या शर्यती आणि बद्धिबळ यांचे उल्लेख येतात.

माहित आहे का तुम्हाला? 

खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनच आहे. खेळांना नियमित व सुसंघटीत स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थालीफेक, रथ, व कुंस्ती, इत्यादीचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिक या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.

खेळाचे महत्त्व :

खेळायला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ खेळामध्ये आहे. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळामुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणाची वाढ होते.

खेळाचे प्रकार:

खेळाचे बैठ आणि मैदानी असे दोन प्रकार आहेत.

बैठे खेळ:  बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ. उदाहरणार्थ., बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, कचकवड्या हे खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात. विशेषत: बाहुला - बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असे.

मैदानी खेळ:

मैदानी खेळामध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत. देशी खेळामध्ये लंगडी, कबड्डी, खो खो इत्यादी खेळाचा समावेश होतो. मुला मुलीमध्ये गोटी, लगोरी, विटीदांडू, भिगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, असे खेळ लोकप्रिय आहेत.

माहित आहे का तुम्हाला?

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या:

बाईसाहेबास शरीराचा शोक फार होता. पहाटेस उठोन मुलखांबाशी जाऊन दोन घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीस फेरफटका करून चार घटका दिवसास खुरकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे.

 विदेशी मैदानी खेळात बॅडमिन, टेबल टेनिस, तसेच हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळाचा समावेश होतो.

  मैदानी खेळामध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत. यात 100 मी,200 मी, मॅरेथॉन आणि अडथळानच्या शर्यती यांचा समावेश होतो.

  शारिरीक कौशल्यावर आधारित मैदानी खेळामध्ये गोळाफेक, थालीफेक, लांब उडी व उंच उडी, पाण्यातील खेळामध्ये पोहण्याचा शर्यती, वॉटर पोलो, तसेच शारीरिक कसरती च्या खेळामध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब इत्यादीचा समावेश होतो.



 २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लेख....

*संविधानाने आपल्याला काय दिले?

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान सभेच्या दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवसाच्या अथक प्रयत्नातून भारतीय संविधान निर्माण झाले. संविधानाने आपल्याला सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व दिल. सनातनी धर्मव्यवस्थेने कष्टकरी, स्त्रिया, श्रमकरी, शेतकरी वर्गाचे नाकारलेले अधिकार संविधानाने दिले. भारतीय संविधानातील कलम एकने आपल्या देशाचे नाव निश्चित केले. ते म्हणजे भारत तथा इंडिया, म्हणजे आपला देश कोणत्याही एका विशिष्ट घराण्याचा, जातीचा, धर्माचा नाही, तर तो सर्व भारतीयांचा देश आहे. आपला देश हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा अनुनय करणार नाही किंवा कोणत्याही धर्माच्या विरोधात राहणार नाही, म्हणजेच धर्मनिरपेक्षता आपल्या संविधानाचे वैशिष्ट्ये आहे.                                             भारतीय संविधानाने समता दिली. जात, धर्म, वंश, लिंग,प्रांत,भाषा आणि जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही, याची हमी भारतीय संविधानाने कलम १४,१५,१६ ने दिलेली आहे. कलम १४ अंतर्गत कायद्यासमोर सर्वांची समानता. संविधानाने कायद्याचे अधिराज्य स्थापून दिले असून कायद्याच्या चौकटीतच राज्य कारभार करणे, राज्यकर्त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या मनमानी, बेकायदेशीर कार्याला आळा बस तसेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायपालिका स्वतंत्र असल्याने राज्यकर्त्यांच्या मनमानी कारभारास चाप बसतो. कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळता येणार नाही,याची तरतूद संविधानाने कलम १७ नुसार केलेली आहे. प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. आपले विचार वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने कलम १९ नुसार दिलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संशोधन, लेखन आणि प्रबोधन करणाऱ्या अनेक महापुरुषांचा छळ झाला, त्यांच्या हत्या झाल्या, त्यामुळे असंख्य सृजनशील पूर्वजांना व्यक्त होता आले नाही. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान देते.                                                   आपल्याला कोणताही वैध व्यवसाय करण्याचे, देशांतर्गत संचार करण्याचे, देशांतर्गत स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान देते. एखाद्या गुन्हेगारांवरील आरोप सिद्ध होईपर्यंत त्याला जामीन मिळवण्याचा अधिकार संविधान देते. जीविताचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कलम २१ नुसार दिलेला आहे. ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक भारतीय मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार याच कलमाअंतर्गत संविधान देते .पोलीस यंत्रणा जर एखाद्या असहाय्य व्यक्तीवर अन्याय करत असेल, तर न्यायालयात रिट दाखल करून न्याय मागता येतो. जय भीम चित्रपटात तपासादरम्यान पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या आरोपीला जेंव्हा फरार घोषित केले तेंव्हा ऍड. चंद्रु हेबिअस कॉर्पसची (where is body) रिट दाखल करून त्याच्या पत्नीला न्याय मिळवून देतात, हा अधिकार संविधानातील कलम ३२ नुसार दिलेला आहे. या कलमाद्वारे थेट सर्वोच्च न्यायालयात पाच प्रकारच्या रिट दाखल करता येते. हा मूलभूत अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कलम ३२ ला संविधानाचा आत्मा म्हणतात.( Article ३२ is heart of Indian constitution). तर कलम २२६ नुसार उच्च न्यायालयात रिट दाखल करता येते. भारतीय संविधानाने वेठबिगारी, बालमजुरी संपुष्टात आणली. कोणत्याही स्त्री-पुरुषांची किंवा लहान मुलांची खरेदी विक्री करता येणार नाही, तसेच कोणत्याही लहान मुलांना कामगार म्हणून ठेवता येणार नाही, याची तरतूद भारतीय संविधानाने कलम २३, २४ नुसार केलेली केली. म्हणजे संविधानाने गुलामगिरी नष्ट केली.आपापल्या धर्मानुसार धार्मिक आचरण करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कलम २५ नुसार दिलेला आहे. अल्पसंख्यांक, आदिवासी, अनुसूचित जाती, शेतकरी, महिला यांच्या विकासाची तरतूद संविधानाने केलेली आहे.सर्व जातिधर्मातील महिला आज सर्व क्षेत्रात आहेत,हे संविधानाने शक्य झाले. कलम १५, २१, ३९,५१ इत्यादी कलमानुसार महिलांचा आदर, सन्मान आणि हक्काबाबतची तरतूद आहे.   सविधानाने ज्याप्रमाणे आपल्याला हक्क अधिकार दिले, तशीच आपल्याला जबाबदारीदेखील दिलेली आहे. संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. वैभवशाली वारशाचा अभिमान बाळगणे, संमिश्र संस्कृतीचा आदर करणे. आपल्या देशाची संस्कृती एकप्रवाही नाही, आपल्या देशात वारकरी, नाथ, शाक्त, शैव, वैष्णव, महानुभव, लिंगायत, सुफी, हिंदू,जैन, बौद्ध, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी इत्यादी धर्म-संप्रदाय आहेत. चिकित्सेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्या सर्वांचा आदर बाळगणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे, असे संविधान कलम ५१ मध्ये सांगते. महिलांचा आदर करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, इत्यादी कर्तव्य   संविधानाने सांगितलेली आहेत. संविधानाने आपल्याला मतदान करण्याचा, नेता निवडण्याचा, नेतृत्व करण्याचा अधिकार दिला. एखाद्या उद्योगपतीचे, नेत्यांचे आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकाच्या मताचे मूल्य एकच आहे. कोणत्याही भारतीय नागरिकाला स्थानिक स्वराज्य संस्था, विधिमंडळ, लोकसभा यामध्ये नेतृत्व करता येते.उपेक्षित वर्गाला राजकीय,  शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळावे, याची तरतूद संविधानाने केलेली आहे, यालाच आपण आरक्षण म्हणतो. भारतीय संविधानातील कलम ३४०, ३४१, आणि ३४२ या कलमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीयांना भारतीय संविधानाने आरक्षण दिलेले आहे.अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, भौगोलिक विविधता असणाऱ्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे. आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतो, त्या पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, कारण पर्यावरणाचे रक्षण झाले तरच मानवाचे अस्तित्व टिकणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणाच्या जबाबदारीची तरतूद देखील संविधानातील कलम ४८ कलम ५१ आणि कलम २१ नुसार करण्यात आलेली आहे.                     भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे जितके कर्तव्यकठोर आहे तितकेच लवचिक आहे. मूळ चौकटीत बदल न करता घटनादुरुस्ती करण्याची तरतूद संविधानात आहे. लोकोपयोगी अनेकवेळा घटनादुरुस्ती झालेल्या आहेत. सविधानाचा आदर करणे,  संविधानाचे संवर्धन करणे आणि  संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. अशा लोककल्याणकारी संविधाची अंमलजावणी २६ जानेवारी १९५० पासून झाली. यालाच प्रजासत्ताक दिन म्हणतात. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान देशाला सादर केले. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 
                               


Wednesday, 18 December 2024

                        भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया

भारत आणि श्रीलंका:-

     श्रीलंका आणि भारत यांचा इतिहास प्राचीन काळापासून एकमेकांशी निगडित आहे .दीपवंश ,महावंश चुळवंश या तीन ग्रंथातून बुद्ध पूर्व काळ आणि बुद्धोत्तर काळात भारतात आणि श्रीलंकेत होऊन गेलेले राजवंश, यांचे परस्परसंबंध आणि घडलेल्या ऐतिहासिक घटना यांची माहिती मिळते.या ग्रंथांना वंशग्रंथ असं म्हटलं जातं.
    वंश ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इसवी सणाच्या सुमारे सहाव्या शतकात श्रीलंकेत स्थापन झालेल्या पहिल्या राज्याचे नाव तांबपणी (ताम्रपनी)असे होते. या राज्याच्या दुसरे नाव राजराट असे होते. ग्रीक इतिहासकाराने श्रीलंकेचा उल्लेख तप्रोबेन असा केला आहे. हे राज्य प्रस्थापित करणारा पहिला राजा विजय हा मूळचा भारताच्या वंग कलिंग राज्यातील युवराज होता अशी आख्यायिका आहे. त्यांच्या राज्यातून तो प्रथम सुपारक (सोपारा)  येथे आला. तेथून तो श्रीलंकेत पोहोचला. 
    सम्राट अशोकाचा पुत्र महिंद महेंद्र यांचे श्रीलंकेची राजधानी अनुराधपुर येथील मिहिंथले येथे आगमन झाले. त्याने श्रीलंकेचा राजा देवानामपिय तिस या राजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिल्याचे सविस्तर वर्णन वंश ग्रंथांमध्ये आहे. उपदेश प्राप्त झाल्यानंतर राजा आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व प्रजननाने बौद्ध धर्म स्वीकारला राजा देवा नामपिय तीस यांच्या धाकट्या भावाची पत्नी अनुला हिने भिकुनी बनवण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा थेर महिन्धाने त्यांची बहीण थेरी संगमित्ता हिला भारतातून बोलवाव अशी सूचना केली. त्यानुसार थेरी संगमित्ता श्रीलंकेला आली. येताना तिने बोधी वृक्षाची फांदी आणली होती. स्वतः राजा देवानंद तिचा स्वागत साठी हजर होता. थेरी संगमित्ताने अनुलाला दीक्षा दिली. अनुलाही भिकुनी झालेली श्रीलंकेची पहिली स्त्री होती. थेरी संगमित्ताने श्रीलंकेतील पहिले भिकू ने शासन प्रस्थापित केले. थेरी संगमित्राच्या आगमनाचे स्मरण म्हणून श्रीलंकेमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेला उंडूउप पोया या नावाचा उत्सव साजरा केला होता. उंदुउप पोया म्हणजे डिसेंबर महिन्यातील पौर्णिमा. 
श्रीलंकेतील महत्त्वाची सांस्कृतिक स्थळे:-
अनुराधपूर मीहिनथले:-
  थेर महिंद आणि थेरी संगमित्ता यांच्या अनुरागपूर जवळच्या विहीन थले येथील वास्तव्यामुळे बौद्ध धर्म श्रीलंकेत रुजला आणि वाढला.
 अनुरागपुर मिहीनथळे येथील महत्त्वाचे स्तूप:-
 कंटकचेतीय हा मेहनथले येथील प्राचीन स्तुपांपैकी एक आहे. स्तुपा जवळ असलेल्या कोरु शिलालेखांमध्ये जवळचा पाण्याचा तलाव आणि जमीन यांवरील करातून मिळणारा निधी या स्तूपांच्या देखभालीसाठी दिल्याचा उल्लेख आहे. 
    मेहनतले येथील थेर महीदकाच्या शारीरिक धातूवर उभारलेला स्तूप आंबस्थल दगाबा या नावाने ओळखला जातो. थेरी संग निमित्ताने श्रीलंकेत येताना तिच्याबरोबर गौतम बुद्धांच्या उजव्या खांद्याच्या अस्थि सोबत आणल्या होत्या. राजा देवा नाम पिया ने अनुरागपुर मध्ये त्या असतील वर धूपारम हा स्तूप बांधला. श्रीलंकेत अस्तित्वात असलेल्या स्तूपामध्ये धुपाराम हा सर्वाधिक प्राचीन स्तूप आहे.
   बुद्धघोष हा प्राचीन श्रीलंकेत होऊन गेलेला एक सुप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ होता. अनुराधपुर मधील महाविहार येथे त्यांचे वास्तव्य होते. विशुद्ध भीम हा त्याने लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ टीपिटक ग्रंथाच्या बरोबरीने महत्त्वाचा समजला जातो.
पुलथिनगर:-
    श्रीलंकेतील रुहुना नावाच्या राज्याचा पहिला पराक्रम बाहू ने पराभव केला. रुहुना राज्याची राजभाषांच्या देखरेख खाली असणारा गौतम बुद्धांचा दंत धातू निसर्ग नावाच्या राजाने परत मिळवला. त्यावर पोलनरुवा येथे त्याने बौद्ध मंदिर बांधले. 
    मंदिराच्या मध्यभागी एक स्तूप आहे. स्तूपाच्या पायथ्याशी अर्धवर्तुळाकृती पायरीचा दगड हे श्रीलंकेच्या स्तूप स्थापत्याचे वैशिष्ट्य आहे. त्याला चंद्रशीला असे म्हणतात. त्यावर हंस, हत्ती, घोडे, आणि वेली यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. 
    पुनर्वा येथील गलपोता हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभिलेख आहे. हा ८.१७मीटर लांबीच्या आणि १.३९ मीटर रुंदीच्या अखंड शिलापट्टा वर कोरलेला लेख असून त्यामध्ये निसर्ग मल्ल या राजाची कारकीर्द आणि पराक्रम यांचे वर्णन आहे. गलपोथाच्या एका बाजूस दोन हंसावलीच्या किनारी मध्ये गजल लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे. 
  श्री दलद मलेगाव या नावाने ओळखलं जाणारे दंत धातूचे सध्याचे मंदिर कॅडी या शहरात आहे. या मंदिराला युनुस्केन जागतिक संस्कृतीचा वारशाचा दर्जा दिला आहे.
   चुल्लवांश या ग्रंथामध्ये पूर्णरुवा या शहराचा उल्लेख पुलच्छिनगर या नावाने केला आहे. शिवसेनाच्या दहाव्या शतकात चोर सम्राट पहिला राजा यांनी श्रीलंकेवर आक्रमण केले आणि अनुराधपूर पूर्णपणे उध्वस्त केले. त्याने पूर्णरुवा येथे आपली राजधानी प्रस्थापित केले. त्यांनी पूर्ण रूपाचे नामकरण जन्नत मंगलम असे केले आणि तेथे एक शिवाले बांधले. त्यानंतर त्याने आपल्या राणीच्या स्मरणाचा आणखी एक शिवालय बांधले. श्रीलंकेत असणाऱ्या हिंदू मंदिरांपैकी ही देवालय सर्वाधिक प्राचीन आहेत. विजय भाऊ यांनी चोळांचा पराभव करून श्रीलंकेतील त्यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. त्यांच्या वंशातील इसवीसनाच्या 12 व्या शतकात होऊन गेलेला पहिला परा पराक्रम भाऊ हा राजा श्रीलंकेतील इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यांच्या काळापर्यंत श्रीलंकेतील बौद्ध संघ विस्कळीत झाले होते. महाथेर कसंप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एकत्रित करण्यावर पहिल्या पराक्रमबाहूने भर दिला.

दामबुल्ल आणि सिगिरिया:-

 श्रीलंकेतील दामबुल्ल येथील बौद्ध लेणी जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झालेले आहे. या ठिकाणी असलेल्या पाच लेण्यांच्या अंतर्भागात गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मूर्ती बरोबर छतावर काढलेले चित्रे आहेत. 

    दामबुल्ल शहराच्या जवळ असलेल्या सिगिरिया येथील पर्वतावर एका प्रचंड मोठ्या खडकावर बांधलेला किल्ला आणि राजवाडा होता. त्या खडकात राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी कोरलेली सिंहाची एक प्रचंड मूर्ती आहे. त्यावरून या ठिकाणांचे नाव सिगिरिया असे पडले. सिगिरिया येथील भिंती चित्रांच्या शैलीची तुलना अजंठा येथील भिंती चित्र शैलेशी केली जाते. 

भारत आणि आग्नेय आशिया:-

  आग्नेय आशियात प्रस्थापित झालेल्या भारतीयांच्या वसाहती आणि राज्य यांची माहिती देणारे भारतीय साहित्य फारसे उपलब्ध नसले तरी चिनी सम्राटांच्या दरबारी नोंदीमध्ये या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे.

  आग्नेय आशियातील देशांशी त्यांच्या भारताचे व्यापारी संबंध इसवी सनापूर्वी पहिले शतक ते इसवी सणाचे पहिले शतक या काळात सुरू झाले. भारतीय व्यापारांसाठी मलाकाच्या सामुद्रधुनी मार्गे येऊन चिनी समुद्रात प्रवेश करण्यासाठी मला या द्वीपकल्प हा सोयीचा बिंदू ठरला. मला या दीपकल्पाच्या पश्चिमेकडे किनाऱ्यावर मान उतरवून तो पूर्व किनाऱ्याकडे नेणे आणि तो परत जहाजावर चढवणे हे संपूर्ण समुद्राला वळसा घालून जाण्यापेक्षा सोयीचे होते. समुद्रमार्गाने चालणारा व्यापार इसवी सनच्या दहाव्या शतकाच्या शेवटी चोर राजांच्या राजवटीत लक्ष्नीयरीत्या वृद्धिंगत झाला. 

  आग्नेय आशिया ही संज्ञा दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात प्रचारात आली. बौद्ध ग्रंथांमध्ये सुवर्णभूमीचा उल्लेख आहे. आग्नेय आशियांचे अभ्यासक त्या प्रदेशाची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांचे दोन विभाग करतात. 

१) मुख्य भूभाग:-या प्रदेशाचा उल्लेख विडो चीन या नावाने केला जातो यामध्ये म्यानमार ,थायलंड ,कंबोडिया, लाऊस ,व्हिएतनाम हे देश आणि मलेशियाचा पश्चिम भाग यांचा समावेश होतो.

२) समुद्री प्रदेश:-म्हणजे मला या दीप समूह ज्यामध्ये मलेशियाचा पूर्व भाग आणि इंडोनेशियाचा समावेश होतो. या एवढ्या मोठ्या प्रदेशाचा समावेश अग्नी अशांमध्ये केला जात असला तरी तेथील संस्कृती आणि इतिहासाच अभ्यास करत असताना तेथील स्थानिक व विद्यार्थ्यांचा विसर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरते. भारतातील लोकांचा आग्नेय आशियातील विविध प्रदेशांच्या असलेल्या संपर्क इसवी सनापूर्वी दुसरे शतक ते इसवी सनाच्या दुसऱ्या शतक या कालखंडात व्यापाऱ्यांच्या निमित्ताने वाढीस लावला होता. या लोकांमार्फत आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला. नव्हे तर त्यातील काहींनी तेथे स्वातंत्र राज्य प्रस्थापित. आग्नेय आशियात प्रस्तुत झालेल्या भारतीय संस्कृतींचा खुणा आजही पाहायला मिळतात.


Thursday, 24 October 2024

भारतीय कलांचा इतिहास

 कला म्हणजे काय?

स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना नाही इतरपर्यंत पोहोचावे ही प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीच्या प्रेरणेने जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली होती, तेव्हा तिला कला असं म्हटलं जातं कारण निर्मितीच्या मुळाशी कलाकारांची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात.

दुक्कलां आणि ललित कला:

दृक कला आणि ललित कला अशी कलाप्रकारांची विभागणी केली जाते. ललित कलांना अंगिक कला असं म्हटलं जातं. ललीत कलाना अंगीक कला असेही म्हणतात. दृकलांचा उगम प्रगतीहासिक काळात झाला, हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत.
लोककला आणि अभिजात कला: 
कलेच्या लोककला आणि अभिजित कला अशा दोन परंपरा मानले जातात. लोक कला ही बसमधून काळापासून अखंडपणे चालत आलेले परंपरा आहे. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. त्यामुळे या परंपरेतील अवि व्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोकप्रयाची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. प्रामाणिक नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसत करण्यासाठी दीर्घकालीन काही प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
कलाशैली:
कलाने निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परस्परांचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कला शैली म्हणून ओळखले जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाची निगडित असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कला शैली विकसित होतात. त्या शैलीच्या आधारे त्या त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो.
भारतातील दृक कला परंपरा:
दृककलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो.
चित्रकला: 
चित्रकला द्विमतीय असते. उदाहरणार्थ, निसर्ग चित्र, वस्तू चित्र, व्यक्तिचित्र, वस्तूचे आरेखन इत्यादी चित्र रेखाटले जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कागदाचे फलक, मातीची भांडी यासारख्या माध्यमांचे उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, अजिंठा लेण्यांमधील बोधिसत्व पद्मपणीच भिंती चित्र.
लोक चित्रकला शैली:
अश्मयुगून काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. 
 भारतामध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीम बैठका येथील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. भीम घटकांचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे करण्यात आलेला आहे. गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती हा प्राणी आणि काही भौतिक आकृतींचा समावेश होतो. पुराश्मयुक्त शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत चित्रांची शैली त्यांचा विशेष यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रामध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो तसेच भविष्याकृतींचा रेखाटण्याचा पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो .या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेला असतात .त्या त्या कालातील लोकांचे त्यांच्या परसपरिसरा संबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्वतःचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञानाचा विकास कसा होत गेला, याचे कल्पना चित्राद्वारे करता येऊ शकते.
तुम्हाला माहित आहे का?
महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगूळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला वैशालीची निवडक उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील जिव्या सोम्या मसे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारस मित्रांसाठी भारतीय आणि जगती स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळालेल्या सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला आहे.
अभिजात चित्रकला:
प्राचीन भारतीय वाड्मयामध्ये विविध कलासंबंधी सांगोपांग विचार झालेले दिसतो. त्यामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेखन किंवा आलेख्य विद्या या नावाने केलाय. आलेख्य विद्येची शरांगे म्हणजे सहा महत्त्वाचे पहिले आहेत. त्याचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता. त्यामध्ये रूप भेद (विविध आकार) प्रमाण (प्रमाणबद्ध) रचना आणि मोजमाप भाव (भाव प्रदर्शन) लावण्यायोजन सौंदर्याचा स्पर्श सादृश्यता वास्तवांच्या जवळ जाणारे चित्र आणि वर्ण का भंग रंगाचा आयोजन यांचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथाचे आग्रमग्रंथ पुराने आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला शिल्पकला यांच्यासंबंधीचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो.
हस्तलिखित मधील लघुचित्रे:
हस्तलिखितरण मधील लघुचित्रावर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडे मुस्लिम राजवटींच्या श्रेया खालील दख्खनीय लघुचित्र शैली विकसित झाली. मुगल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्र शैलीचा उदय झाला.
युरोपीय चित्रशैली:
ब्रिटिश राजवटीत 500 चे चित्र शैलीचा प्रभाव भारतीय चित्र श्रेय पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवारवाडा सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेळ या स्कुटी चित्रकाराचे नेतृत्वाखाली एक कला शाळा स्थापन करण्यात आले होते. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढलं होतं. वेस्ट सोबत काम करणारे एक मोठी मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचे येथे विशेष उल्लेख करायला हवा . त्यांनी वेरूळ कारले याची लेण्यांची चित्र काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील विद्यापीठात असलेल्या एल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेले आहेत. चित्र वस्तूंचे उपयोग चित्र हे पाश्चाचे चित्र शैलीचे वैशिष्ट्य समाजाले जाते.मुंबईत सण 1857 मध्ये स्थापन झालेल्या जे. जे .स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्त्य कला शैलीचे शिक्षण देणाऱ्या शालेयतुन अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमनजी म्हणजे अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रत्येक कृती बनण्याचं काम केलं.

शिल्पकला:

शिल्पकला त्रिमती असते. उदाहरणार्थ, मूर्ती, पुतळा, कालापूर्ण भांडी आणि वस्तू. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू, माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड जिल्हा अखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. सारणातील असे स्तंभाचे शीर्षावरील चार सिंहाच्या शिल्पा व आधारलेले चित्र हे भारताच्या राष्ट्रीय मानचिन्ह आहे.

Tuesday, 22 October 2024

आर्थिक विकास

 भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचा राष्ट्रीयकरण, वीस कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप. 
मिश्र अर्थव्यवस्था:
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकाराच्या अर्थव्यवस्था स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांना कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्या ऐवजी मध्यमवर्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती प्रत्येक कर्तव्यवस्थेचे काही फायदे आणि तोटे असतात.
अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीच्या असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन साधने समाजाच्या तसेच शासनाच्या मालकीचे असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते . भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्था भारताने प्राधान्य दिलेले आहेत या अर्थव्यवस्था आपणास तीन भाग दिसून येतात.
1) सार्वजनिक क्षेत्र: या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ .संरक्षण साहित्य उत्पादन.
2) खाजगी क्षेत्र: या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ, उपभोग्य वस्तू.

3)संयुक्त क्षेत्र: या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे, तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात.
 पंचवार्षिक योजना:
भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ ,निष्कृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांचे उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधीचे मागासले पण अशा बिकट समस्या देशासमोर होता. त्या सोडण्यासाठी नियोजनाची गरज होती. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते.
योजनांची उद्दिष्टे:
भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 
1) राष्ट्रीय उत्पादनात वाढ. 
2) मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट आणि         
 उद्योगीकरण घडवून आणणे. 
3) अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वालंबी बनवा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. 
4) वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून, देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे.
5) प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. 
6) वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. 
7) कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येने आळा     घाळणे .
पहिली पंचवार्षिक योजना (1951 ते 1956):
या योजनेत शेती,सामाजिक विकास जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिज, वाहतूक व दळणवळण ,शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारे ही योजना होती.
दुसरी पंचवार्षिक योजना (1956 ते 1961):
या योजनेत औद्योगीकीरणाचे महत्त्कांवाक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापुर, भिलाई, राउरकेला येथील कारखाने, सेंद्रिय येथील रसायनिक खताचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरामपूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापटटणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्चे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आली.
तिसरी पंचवार्षिक योजना (1961 ते 1966):
या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते दरसाल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे अवजड उद्योग वाहतूक व खनिज उद्योग विकास विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता .

                    प्रसारमाध्यमे आणि इतिहास प्रसारमाध्यमांची ओळख : प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार चा...