प्रसारमाध्यमे आणि इतिहास
प्रसारमाध्यमांची ओळख : प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार चा अर्थ दूरवर पोहोचवणे. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. पूर्वी गावोगावी दवंडी पिटवत असे. एकाकडून दुसऱ्या बाजूला दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रवास व्हायचा.
प्रसारमाध्यमांचा इतिहास: आता इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रण कला, वर्तमानपत्रे सुरू झाले. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले.
वर्तमानपत्रे: मुख्यत: बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाचे विविध बातम्या पूर्वीचे काम करतात. चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्र म्हणजे एक ऐतिहासिक दस्ताऐवज होय.
वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी: इजिप्त मध्ये इसवीसन पूर्वकाळात सरकारी अधिवेशन कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढाच व ते कागद प्रांत क्रांती वाटले जात. यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असेल. ज्युनियस सीजरच्या अधिपत्याखाली ॲकटा डायना (डेली ॲक्ट -रोजच्या घटना) नावाची वृत्तपत्रे, रोम मध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच घटनांची पत्रके अधून मधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी, तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असेल. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असेल. ते ताज्या बातम्या राजदरबार पाठवत.
No comments:
Post a Comment