Wednesday, 18 December 2024

                        भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया

भारत आणि श्रीलंका:-

     श्रीलंका आणि भारत यांचा इतिहास प्राचीन काळापासून एकमेकांशी निगडित आहे .दीपवंश ,महावंश चुळवंश या तीन ग्रंथातून बुद्ध पूर्व काळ आणि बुद्धोत्तर काळात भारतात आणि श्रीलंकेत होऊन गेलेले राजवंश, यांचे परस्परसंबंध आणि घडलेल्या ऐतिहासिक घटना यांची माहिती मिळते.या ग्रंथांना वंशग्रंथ असं म्हटलं जातं.
    वंश ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इसवी सणाच्या सुमारे सहाव्या शतकात श्रीलंकेत स्थापन झालेल्या पहिल्या राज्याचे नाव तांबपणी (ताम्रपनी)असे होते. या राज्याच्या दुसरे नाव राजराट असे होते. ग्रीक इतिहासकाराने श्रीलंकेचा उल्लेख तप्रोबेन असा केला आहे. हे राज्य प्रस्थापित करणारा पहिला राजा विजय हा मूळचा भारताच्या वंग कलिंग राज्यातील युवराज होता अशी आख्यायिका आहे. त्यांच्या राज्यातून तो प्रथम सुपारक (सोपारा)  येथे आला. तेथून तो श्रीलंकेत पोहोचला. 
    सम्राट अशोकाचा पुत्र महिंद महेंद्र यांचे श्रीलंकेची राजधानी अनुराधपुर येथील मिहिंथले येथे आगमन झाले. त्याने श्रीलंकेचा राजा देवानामपिय तिस या राजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिल्याचे सविस्तर वर्णन वंश ग्रंथांमध्ये आहे. उपदेश प्राप्त झाल्यानंतर राजा आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व प्रजननाने बौद्ध धर्म स्वीकारला राजा देवा नामपिय तीस यांच्या धाकट्या भावाची पत्नी अनुला हिने भिकुनी बनवण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा थेर महिन्धाने त्यांची बहीण थेरी संगमित्ता हिला भारतातून बोलवाव अशी सूचना केली. त्यानुसार थेरी संगमित्ता श्रीलंकेला आली. येताना तिने बोधी वृक्षाची फांदी आणली होती. स्वतः राजा देवानंद तिचा स्वागत साठी हजर होता. थेरी संगमित्ताने अनुलाला दीक्षा दिली. अनुलाही भिकुनी झालेली श्रीलंकेची पहिली स्त्री होती. थेरी संगमित्ताने श्रीलंकेतील पहिले भिकू ने शासन प्रस्थापित केले. थेरी संगमित्राच्या आगमनाचे स्मरण म्हणून श्रीलंकेमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेला उंडूउप पोया या नावाचा उत्सव साजरा केला होता. उंदुउप पोया म्हणजे डिसेंबर महिन्यातील पौर्णिमा. 
श्रीलंकेतील महत्त्वाची सांस्कृतिक स्थळे:-
अनुराधपूर मीहिनथले:-
  थेर महिंद आणि थेरी संगमित्ता यांच्या अनुरागपूर जवळच्या विहीन थले येथील वास्तव्यामुळे बौद्ध धर्म श्रीलंकेत रुजला आणि वाढला.
 अनुरागपुर मिहीनथळे येथील महत्त्वाचे स्तूप:-
 कंटकचेतीय हा मेहनथले येथील प्राचीन स्तुपांपैकी एक आहे. स्तुपा जवळ असलेल्या कोरु शिलालेखांमध्ये जवळचा पाण्याचा तलाव आणि जमीन यांवरील करातून मिळणारा निधी या स्तूपांच्या देखभालीसाठी दिल्याचा उल्लेख आहे. 
    मेहनतले येथील थेर महीदकाच्या शारीरिक धातूवर उभारलेला स्तूप आंबस्थल दगाबा या नावाने ओळखला जातो. थेरी संग निमित्ताने श्रीलंकेत येताना तिच्याबरोबर गौतम बुद्धांच्या उजव्या खांद्याच्या अस्थि सोबत आणल्या होत्या. राजा देवा नाम पिया ने अनुरागपुर मध्ये त्या असतील वर धूपारम हा स्तूप बांधला. श्रीलंकेत अस्तित्वात असलेल्या स्तूपामध्ये धुपाराम हा सर्वाधिक प्राचीन स्तूप आहे.
   बुद्धघोष हा प्राचीन श्रीलंकेत होऊन गेलेला एक सुप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ होता. अनुराधपुर मधील महाविहार येथे त्यांचे वास्तव्य होते. विशुद्ध भीम हा त्याने लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ टीपिटक ग्रंथाच्या बरोबरीने महत्त्वाचा समजला जातो.
पुलथिनगर:-
    श्रीलंकेतील रुहुना नावाच्या राज्याचा पहिला पराक्रम बाहू ने पराभव केला. रुहुना राज्याची राजभाषांच्या देखरेख खाली असणारा गौतम बुद्धांचा दंत धातू निसर्ग नावाच्या राजाने परत मिळवला. त्यावर पोलनरुवा येथे त्याने बौद्ध मंदिर बांधले. 
    मंदिराच्या मध्यभागी एक स्तूप आहे. स्तूपाच्या पायथ्याशी अर्धवर्तुळाकृती पायरीचा दगड हे श्रीलंकेच्या स्तूप स्थापत्याचे वैशिष्ट्य आहे. त्याला चंद्रशीला असे म्हणतात. त्यावर हंस, हत्ती, घोडे, आणि वेली यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. 
    पुनर्वा येथील गलपोता हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभिलेख आहे. हा ८.१७मीटर लांबीच्या आणि १.३९ मीटर रुंदीच्या अखंड शिलापट्टा वर कोरलेला लेख असून त्यामध्ये निसर्ग मल्ल या राजाची कारकीर्द आणि पराक्रम यांचे वर्णन आहे. गलपोथाच्या एका बाजूस दोन हंसावलीच्या किनारी मध्ये गजल लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे. 
  श्री दलद मलेगाव या नावाने ओळखलं जाणारे दंत धातूचे सध्याचे मंदिर कॅडी या शहरात आहे. या मंदिराला युनुस्केन जागतिक संस्कृतीचा वारशाचा दर्जा दिला आहे.
   चुल्लवांश या ग्रंथामध्ये पूर्णरुवा या शहराचा उल्लेख पुलच्छिनगर या नावाने केला आहे. शिवसेनाच्या दहाव्या शतकात चोर सम्राट पहिला राजा यांनी श्रीलंकेवर आक्रमण केले आणि अनुराधपूर पूर्णपणे उध्वस्त केले. त्याने पूर्णरुवा येथे आपली राजधानी प्रस्थापित केले. त्यांनी पूर्ण रूपाचे नामकरण जन्नत मंगलम असे केले आणि तेथे एक शिवाले बांधले. त्यानंतर त्याने आपल्या राणीच्या स्मरणाचा आणखी एक शिवालय बांधले. श्रीलंकेत असणाऱ्या हिंदू मंदिरांपैकी ही देवालय सर्वाधिक प्राचीन आहेत. विजय भाऊ यांनी चोळांचा पराभव करून श्रीलंकेतील त्यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. त्यांच्या वंशातील इसवीसनाच्या 12 व्या शतकात होऊन गेलेला पहिला परा पराक्रम भाऊ हा राजा श्रीलंकेतील इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यांच्या काळापर्यंत श्रीलंकेतील बौद्ध संघ विस्कळीत झाले होते. महाथेर कसंप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एकत्रित करण्यावर पहिल्या पराक्रमबाहूने भर दिला.

दामबुल्ल आणि सिगिरिया:-

 श्रीलंकेतील दामबुल्ल येथील बौद्ध लेणी जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झालेले आहे. या ठिकाणी असलेल्या पाच लेण्यांच्या अंतर्भागात गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मूर्ती बरोबर छतावर काढलेले चित्रे आहेत. 

    दामबुल्ल शहराच्या जवळ असलेल्या सिगिरिया येथील पर्वतावर एका प्रचंड मोठ्या खडकावर बांधलेला किल्ला आणि राजवाडा होता. त्या खडकात राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी कोरलेली सिंहाची एक प्रचंड मूर्ती आहे. त्यावरून या ठिकाणांचे नाव सिगिरिया असे पडले. सिगिरिया येथील भिंती चित्रांच्या शैलीची तुलना अजंठा येथील भिंती चित्र शैलेशी केली जाते. 

भारत आणि आग्नेय आशिया:-

  आग्नेय आशियात प्रस्थापित झालेल्या भारतीयांच्या वसाहती आणि राज्य यांची माहिती देणारे भारतीय साहित्य फारसे उपलब्ध नसले तरी चिनी सम्राटांच्या दरबारी नोंदीमध्ये या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे.

  आग्नेय आशियातील देशांशी त्यांच्या भारताचे व्यापारी संबंध इसवी सनापूर्वी पहिले शतक ते इसवी सणाचे पहिले शतक या काळात सुरू झाले. भारतीय व्यापारांसाठी मलाकाच्या सामुद्रधुनी मार्गे येऊन चिनी समुद्रात प्रवेश करण्यासाठी मला या द्वीपकल्प हा सोयीचा बिंदू ठरला. मला या दीपकल्पाच्या पश्चिमेकडे किनाऱ्यावर मान उतरवून तो पूर्व किनाऱ्याकडे नेणे आणि तो परत जहाजावर चढवणे हे संपूर्ण समुद्राला वळसा घालून जाण्यापेक्षा सोयीचे होते. समुद्रमार्गाने चालणारा व्यापार इसवी सनच्या दहाव्या शतकाच्या शेवटी चोर राजांच्या राजवटीत लक्ष्नीयरीत्या वृद्धिंगत झाला. 

  आग्नेय आशिया ही संज्ञा दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात प्रचारात आली. बौद्ध ग्रंथांमध्ये सुवर्णभूमीचा उल्लेख आहे. आग्नेय आशियांचे अभ्यासक त्या प्रदेशाची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांचे दोन विभाग करतात. 

१) मुख्य भूभाग:-या प्रदेशाचा उल्लेख विडो चीन या नावाने केला जातो यामध्ये म्यानमार ,थायलंड ,कंबोडिया, लाऊस ,व्हिएतनाम हे देश आणि मलेशियाचा पश्चिम भाग यांचा समावेश होतो.

२) समुद्री प्रदेश:-म्हणजे मला या दीप समूह ज्यामध्ये मलेशियाचा पूर्व भाग आणि इंडोनेशियाचा समावेश होतो. या एवढ्या मोठ्या प्रदेशाचा समावेश अग्नी अशांमध्ये केला जात असला तरी तेथील संस्कृती आणि इतिहासाच अभ्यास करत असताना तेथील स्थानिक व विद्यार्थ्यांचा विसर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरते. भारतातील लोकांचा आग्नेय आशियातील विविध प्रदेशांच्या असलेल्या संपर्क इसवी सनापूर्वी दुसरे शतक ते इसवी सनाच्या दुसऱ्या शतक या कालखंडात व्यापाऱ्यांच्या निमित्ताने वाढीस लावला होता. या लोकांमार्फत आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला. नव्हे तर त्यातील काहींनी तेथे स्वातंत्र राज्य प्रस्थापित. आग्नेय आशियात प्रस्तुत झालेल्या भारतीय संस्कृतींचा खुणा आजही पाहायला मिळतात.


No comments:

Post a Comment

                    प्रसारमाध्यमे आणि इतिहास प्रसारमाध्यमांची ओळख : प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार चा...