Sunday, 26 January 2025

                          खेळ आणि इतिहास 

मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ.

खेळाचा इतिहास हा माणसाएवढाच जुना आहे कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार हा जसा उदरनिर्वाहचा मार्ग होता तसाच तो खेळ व मनोरंजनाचा एक भाग होता. भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यातून दूत, कुस्ती,रथ, आणि घोड्यांच्या शर्यती आणि बद्धिबळ यांचे उल्लेख येतात.

माहित आहे का तुम्हाला? 

खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनच आहे. खेळांना नियमित व सुसंघटीत स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थालीफेक, रथ, व कुंस्ती, इत्यादीचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिक या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.

खेळाचे महत्त्व :

खेळायला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ खेळामध्ये आहे. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळामुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणाची वाढ होते.

खेळाचे प्रकार:

खेळाचे बैठ आणि मैदानी असे दोन प्रकार आहेत.

बैठे खेळ:  बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ. उदाहरणार्थ., बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, कचकवड्या हे खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात. विशेषत: बाहुला - बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असे.

मैदानी खेळ:

मैदानी खेळामध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत. देशी खेळामध्ये लंगडी, कबड्डी, खो खो इत्यादी खेळाचा समावेश होतो. मुला मुलीमध्ये गोटी, लगोरी, विटीदांडू, भिगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, असे खेळ लोकप्रिय आहेत.

माहित आहे का तुम्हाला?

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या:

बाईसाहेबास शरीराचा शोक फार होता. पहाटेस उठोन मुलखांबाशी जाऊन दोन घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीस फेरफटका करून चार घटका दिवसास खुरकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे.

 विदेशी मैदानी खेळात बॅडमिन, टेबल टेनिस, तसेच हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळाचा समावेश होतो.

  मैदानी खेळामध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत. यात 100 मी,200 मी, मॅरेथॉन आणि अडथळानच्या शर्यती यांचा समावेश होतो.

  शारिरीक कौशल्यावर आधारित मैदानी खेळामध्ये गोळाफेक, थालीफेक, लांब उडी व उंच उडी, पाण्यातील खेळामध्ये पोहण्याचा शर्यती, वॉटर पोलो, तसेच शारीरिक कसरती च्या खेळामध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब इत्यादीचा समावेश होतो.



No comments:

Post a Comment

                    प्रसारमाध्यमे आणि इतिहास प्रसारमाध्यमांची ओळख : प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार चा...